Ad will apear here
Next
‘सुजाण मतदारांनी कर्तव्य म्हणून मतदान करावे’
मुख्य निवडणूक अधिकारी अश्वनी कुमार यांचे आवाहन
मुंबई : ‘लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या आणि शेवटच्या टप्प्यात मुंबईसह राज्यातील शहरी भागांतील १७ मतदारसंघांमध्ये २९ एप्रिलला मतदान होणार आहे. शहरी भागात मतदानाची कमी टक्केवारी ही चिंतेची बाब आहे. मतदानाच्या दिवशी जोडून सुट्ट्या आल्या असल्या, तरी मतदानाचे कर्तव्य बजावून लोकशाही समृद्ध करणाऱ्या राष्ट्रीय महोत्सवात सुजाण नागरिकांनी सहभागी व्हावे,’ असे आवाहन राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी अश्वनी कुमार यांनी केले आहे.

ते म्हणाले, ‘प्रत्येक मतदाराला निर्भय व मुक्त वातावरणामध्ये मतदान करता यावे यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. सर्वसाधारणपणे, ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागातील मतदानाचे प्रमाण कमी असते असा आजवरचा अनुभव आहे. या वेळी ही परिस्थिती बदलली पाहिजे. मुंबईला देशाच्या आर्थिक राजधानीचा लौकिक प्राप्त झाला आहे. ते या महानगरातील आणि परिसरातील नागरिकांच्या प्रयत्नाचे यश आहे. शहरी भागातील मतदानाचे प्रमाण वाढविणे ही सुजाण नागरिक म्हणून प्रत्येकाची जबाबदारी आहे. मतदानाच्या दिवशी सुट्टी आणि त्याला जोडून आलेल्या शनिवार, रविवारच्या सुट्या म्हणून बाहेरगावी जाऊ नका. मतदान करा. महिलांनी व युवकांनीदेखील मोठया संख्येने मतदान करावे.’

‘लोकशाहीमध्ये आपला प्रतिनिधी निवडण्याचा अधिकार हा सर्वस्वी आपला आहे. तेव्हा तो बजावलाच पाहिजे. लोकशाही बळकट करण्यासाठी या राष्ट्रीय महोत्सवामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हा आणि कोणत्याही दबावाला किंवा प्रलोभनाला बळी न पडता निर्भयपणाने मतदान करा,’ असे आवाहन कुमार यांनी केले आहे.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/QZJHBZ
Similar Posts
‘लोकराज्य’चा निवडणूक विशेषांक प्रकाशित मुंबई : निवडणूक प्रक्रियेची ओळख करून देणाऱ्या तसेच मतदार व उमेदवारांसोबतच अभ्यासक, विश्लेषकांना मार्गदर्शक ठरणाऱ्या लोकराज्यच्या निवडणूक विशेषांकाचे प्रकाशन अपर मुख्य सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी अश्वनी कुमार यांच्या हस्ते चार एप्रिल २०१९ रोजी येथे झाले. अश्वनी कुमार हे या अंकाचे अतिथी संपादक आहेत
मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी सदिच्छादूतांचे आवाहन मुंबई : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा, मतदान हक्काचे महत्त्व सांगण्यासाठी निवडणूक आयोगातर्फे मतदार जागृतीचे विविध उपक्रम राबविले जात आहेत. मतदार जागृतीच्या या उपक्रमांना आता कला, क्रीडा, साहित्य आणि सामाजिक क्षेत्रातील विविध १२ मान्यवरांची ‘सदिच्छादूत’ म्हणून साथ लाभली आहे.
मतदान आणि मतमोजणीच्या दिवशी ‘कोरडा दिवस’ मुंबई : ‘लोकसभा निवडणुकीच्या मतदान आणि मतमोजणीच्या दिवशी मतदानाची वेळ संपण्याच्या ४८ तास आधीपासून, तसेच मतमोजणीच्या दिवशी मद्यविक्री करण्यास मनाई करण्यात आली आहे. हे दिवस ‘कोरडा दिवस’ म्हणून संबंधित जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी जाहीर करावे,’ असे निर्देश मुख्य निवडणूक अधिकारी यांच्यामार्फत देण्यात आले आहेत
पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी ४४ हजार ईव्हीएम, २० हजार व्हीव्हीपॅट यंत्रे सज्ज मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी महाराष्ट्रातील सात मतदारसंघामध्ये ११ एप्रिल २०१९ रोजी मतदान होत आहे. आठवडाभरावर आलेल्या मतदानासाठी निवडणूक यंत्रणेची जय्यत तयारी सुरू आहे. पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी एकूण ११६ उमेदवार आहेत. सात मतदारसंघात १४ हजार ९१९ मतदान केंद्रे आहेत, तर एक कोटी ३० लाख ३५ हजार मतदार आहेत

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language